Home Latest Posts स्मारक समितीतर्फे छत्रपती शंभू राजे जन्मोत्सव साजरा

स्मारक समितीतर्फे छत्रपती शंभू राजे जन्मोत्सव साजरा

स्मारक समितीतर्फे छत्रपती शंभू राजे जन्मोत्सव साजरा

जालना, 14 मे (हिं.स.) छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, शिवपुत्र छञपती संभाजी महाराज यांचा 366 वा जन्मोत्सव रविवारी ( ता. 14) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी आ.अरविंदराव चव्हाण, स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष गाजरे , उपाध्यक्ष राजेश राऊत, सचिव विष्णू पाचफुले ,मुख्य संघटक ज्ञानेश्वर ( माऊली) ढोबळे यांच्यासह समिती सदस्य व शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.