नाशिक, 15 मे (हिं.स.) : संत श्रीमुक्ताईच्या 726 व्या अंतर्धान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका घेवून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीमंत माऊली प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष विनीत सबनीस व श्री संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी हजेरी लावली होती. कडाक्याचे ऊन असतानाही दुपारी बाराच्या सुमारास संत मुक्ताई यांचा अंतर्धान समाधी सोहळा साजरा झाला. संत निवृत्तीनाथांकडून संत श्री मुक्ताईस गुरुबंधू कडून साडी चोळी देण्याची सेवा झाली.
यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी संत घोष केला. विविध तीर्थक्षेत्रावरून आलेले हजारो वारकरी उपस्थित होते.या दोन्ही बहीण भावांनी व येथे आलेल्या संतांच्या पालख्यांनी जमलेल्या वारकरी वर्गाला दर्शनाने आशीर्वचन दिल्याची दिव्याची दिव्य भावना, वारकरी वर्गात जगली. श्री मुक्ताईनगर संस्थान कडून सबनीस व गाढवे यांचे स्वागत करण्यात आले.
हे स्वागत रवींद्र पाटील- अध्यक्ष, संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांचे कडून करण्यात आले. वारकरी वर्गातील मान्यवर तसेच जयंत महाराज गोसावी विश्वस्त कुलकर्णी हे उपस्थित होते.
अशी पावली मुक्ताई अंतर्धान.
मुक्ताईचा समाधी सोहळा वैशाख वद्य दशमीला दुपारी १२ वाजता असतो शके 1219या दिवशी मुक्ताई आध्यत्मिक संदर्भानुसार अंतर्धान पावल्या
समाधी चे संत नांमदेवानी केलेले वर्णन
गर्जना गगनी कडाडली वीज
स्वरूपी सहज मिळयेली
कडाडली वीज निरंजनी जेंव्हा
मुक्ताबाई तेंव्हा गुप्त झाली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply