नाशिक, 15 मे (हिं.स.) : राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सातभाई नगर, जेलरोड, नाशिकरोड येथे युवा वॉरियर्स शाखेचा शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अधिकाअधिक युवाकापर्यंत केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे. विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी युवकांनी योगदान दिले पाहिजे. नाशिक शहर युवा मोर्चाचे काम चांगले सुरु असून आ. राहुल ढिकले यांच्या माध्यमातून या मतदार संघाचा विकास घडत असल्याचे विखे यांनी सांगितले.
या उदघाटनाप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ.ॲड.राहुल ढिकले, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनिल केदार, जगन पाटील, युवा मोर्चा शहरध्यक्ष अमित घुगे, मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, अशोक सातभाई, योगेश मैंद, संदिप शिरोळे, सागर शेलार, डॉ.ऋषिकेश आहेर, अंकित संचेती, विशाल सातभाई, दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, शरद मोरे, अंबादास पगारे, पंडीत आवारे, राजेश आढाव, सचिन हांडगे, शांताराम घंटे, मुकुंद आढाव, नवनाथ ढगे, अविनाश पाटील, राजनंदिनी आहेर, ज्योती चव्हाणके, तेजश्री काठे, डॉ.वैभव महाले, शाखा अध्यक्ष कृष्णा भोर, विशाल पगार, भुषण विसपुते,ऋषिकेश नारद, प्रशांत वाघ, मुफद्दल पेंटर, विनोद येवले, संदिप कारवाल, अभय सातभाई, समाधान सांगळे, भुषण सहाणे, दिपक आढाव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply