Home Latest Posts

Category: Latest Posts

Post
देशवासियांचे उत्तम आरोग्य, समृद्धी, कल्याणासाठी पंतप्रधानांची भगवान ब्रह्माकडे प्रार्थना

देशवासियांचे उत्तम आरोग्य, समृद्धी, कल्याणासाठी पंतप्रधानांची भगवान ब्रह्माकडे प्रार्थना

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुष्कर मंदिरात पूजा केली आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी ट्विट केले, “पुष्करमध्ये भगवान ब्रह्माजींच्या मंदिरात पुजा आणि दिव्य दर्शनाचे भाग्य प्राप्त झाले. देशवासियांचे उत्तम आरोग्य , समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. हिंदुस्थान समाचार

Post
कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि लोकायन सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि बहुद्देशीय संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक लोकसंस्कृतीत प्रदूषण : कुप्रथा’ या विषयात राष्ट्रीय संशोधन परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे दि. 26, 27, 28 मे 2023 या कालावधीत संपन्न झाली. या परिषदेमध्ये मुख्य वक्त्यांचे मार्गदर्शन, अभ्यासकांचे विविध सत्रात शोध...

Post
स्मारक समितीतर्फे छत्रपती शंभू राजे जन्मोत्सव साजरा

स्मारक समितीतर्फे छत्रपती शंभू राजे जन्मोत्सव साजरा

जालना, 14 मे (हिं.स.) छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, शिवपुत्र छञपती संभाजी महाराज यांचा 366 वा जन्मोत्सव रविवारी ( ता. 14) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी आ.अरविंदराव चव्हाण, स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष गाजरे , उपाध्यक्ष राजेश...

Post
विपरित स्थितीवर मात करून यश मिळवणे, सावरकर स्मारकात आंतरजालाच्या सहाय्याने खास शो

विपरित स्थितीवर मात करून यश मिळवणे, सावरकर स्मारकात आंतरजालाच्या सहाय्याने खास शो

मुंबई, 15 मे (हिं.स.) : आर्थिक, शारिरीक, बौद्धिक आदी स्तरावरील विपरित अशा स्थितीतही आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी जगातील अनेक व्यक्ती, खेळाडू, अभ्यासक, विद्यार्थी यांनी परिस्थितीवर मात केली आहे. वास्तविक अशा प्रकारच्या व्यक्तींकडून प्रत्येकाने बोध घ्यायचा असतो, त्याद्वारे आपल्या क्षमतांचा सर्वाधिक वापर करण्याची मानसिकता तयार करीत काम करायचे असते. त्यामुळे व्यक्तिगत आणि राष्ट्राचेही नाव मोठे करण्याचे...

Post
संत मुक्ताबाईंचा स्वरूपाकार दिन

संत मुक्ताबाईंचा स्वरूपाकार दिन

मुक्ताबाई १९ मे १२९७ या दिवशी स्वरूपाकार झाल्यानिमित्त… विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशा अलौकिक अध्यात्मिक तेज असलेल्या मुलांचा जन्म झाला. या सर्वांचा जन्म ही ईश्वराची योजना होती. द्वापारयुगाच्या अखेरीस आणि कलियुगाच्या प्रारंभी श्रीकृष्णाने उद्धवाकडून कवी, हरी, अंतरिक्ष, नारायण, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन या नवनारायणांना द्वारकेत भेटण्यासाठी बोलावून...

Post
छत्रपती संभाजींच्या शौर्यामुळेच स्वराज्याचे रक्षण – शिवरत्न शेटे

छत्रपती संभाजींच्या शौर्यामुळेच स्वराज्याचे रक्षण – शिवरत्न शेटे

नाशिक, 15 मे (हिं.स.) : छत्रपती संभाजी महाराज यांनी संपूर्ण आयुष्यभर अतुलनीय शौर्य गाजवत मराठ्यांचे हिंदवी राज्य जिंकन्याचं औरंगजेबाचं स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण होऊ दिले नाही, असे गौरवोद्गार शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी केले. स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान पुष्प गुंफण्यात आले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानाचे प्रायोजक योगेश खैरे, नगरसेवक शाहू खैरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घाडगे...

Post
नाशिक : संत मुक्ताई समाधी सोहळा मुक्ताईनगरमध्ये संपन्न

नाशिक : संत मुक्ताई समाधी सोहळा मुक्ताईनगरमध्ये संपन्न

नाशिक, 15 मे (हिं.स.) : संत श्रीमुक्ताईच्या 726 व्या अंतर्धान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका घेवून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीमंत माऊली प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष विनीत सबनीस व श्री संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी हजेरी लावली होती. कडाक्याचे ऊन असतानाही दुपारी बाराच्या सुमारास संत मुक्ताई यांचा अंतर्धान समाधी सोहळा साजरा...

Post
नाशिक : विखे-पाटील यांच्या हस्ते युवा वॉरियर्स शाखेचे उदघाटन

नाशिक : विखे-पाटील यांच्या हस्ते युवा वॉरियर्स शाखेचे उदघाटन

नाशिक, 15 मे (हिं.स.) : राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सातभाई नगर, जेलरोड, नाशिकरोड येथे युवा वॉरियर्स शाखेचा शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अधिकाअधिक युवाकापर्यंत केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे. विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी युवकांनी योगदान दिले पाहिजे. नाशिक शहर युवा मोर्चाचे काम चांगले...

Post
शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल

शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल

पुणे, 14 मे (हिं.स.) : पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय कार्यक्रमात पाटील बोलत होते. आमदार...

Post
छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभूराजांच्या जयंतीनिमित्त रॅली, मिरवणूका, शोभायात्रा

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभूराजांच्या जयंतीनिमित्त रॅली, मिरवणूका, शोभायात्रा

छत्रपती संभाजीनगर, 14 मे (हिं.स.) कित्येक दशके प्रलंबित पडलेले औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर यंदा झाले. शहरवासीयांमध्ये यामुळे मोठा उत्साह व आनंद संचारलेला आहे. याचा प्रत्यय रविवारी दि.14 मे रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने आला. रविवार शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मिरवणुका, रॅली, शोभायात्रा काढण्यात आल्या. यात सर्वपक्षीय...