अमरावती, 5 जून (हिं.स.) : ओरिसा राज्यातील बालासोर बहनागा बाजार स्टेशन जवळ रेल्वेचा मोठा अपघात झाला, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीमधे टक्कर झाली असून या अपघातात २७५ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ११०० पेक्षा जास्त प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत ,ही घटना अतिशय दुःखद व सामान्य माणसांचे मन हेलावणारी असून या रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे, या घटनेतील मृत्तकांना जिल्हा काँग्रेस ग्रामीणच्या वतीने मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिन्यात आली , झालेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करीत, मृत्तकांना मेणबत्त्या पेटून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ.बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजली वाहिन्यात आली, तसेच अपघातातील जखमी प्रवासी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली,या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत द्यावी व जखमींना देखील भरीव मदत द्यावी अशी मागणी केंद्र शासना कडे करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply