नाशिक, ३ जून (हिं.स.)- ज्याच्या जवळ त्यालाच कळतं असे म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना टोला दिला असून आमच्यावरती कितीही दडपण आलं तरी आम्ही पक्ष सोडून कधी गेलो नाही, असा चिमटा देखील काढला आहे.
संजय राऊत यांनी शनिवारी त्रंबकेश्वर येथे जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्यावरती अनेक दडपण आली परंतु आम्ही कधीही पक्ष सोडून गेलो नाही पक्षाच्या एकनिष्ठ शी बांधील राहिलो त्यामुळे आम्हाला कोणीही तत्त्वज्ञान शिकवायची आवश्यकता नाही असा चिमटा काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बाबतीत म्हणाले की आमचे जळालं म्हणून आम्हाला कळालं तुमच्या ज्या वेळेस जळेल त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल असा टोला देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत पत्रकारांशी बोलताना थुंकून या विषयावरती बोलताना ते म्हणाले की आम्ही थुंकून कधी चाटत नाही त्यामुळे आम्हाला कोणीही तत्त्वज्ञान शिकू नये असे स्पष्ट करताना त्यांनी स्वतःची तुलना स्वतंत्र वीर सावरकर यांच्याशी केली त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त विधानाने ते अडचणी सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply