चंद्रपूर 29 मे (हिं.स.):खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दिल्ली येथे उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील ”वेदांता हॉस्पिटल” येथे उपचार सुरू आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर कोणतीही अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये,खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करावी असेही धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply