नाशिक, 26 मे, (हिं.स.) – नाशिक शहरातील अॅटो अॅण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो राज्यासह देशासाठी अभिमानाची बाब आहे. एक्स्पोमुळे वाहतुक क्षेत्रातील गतिमानतेने झालेले बदल व नवतंत्रज्ञानाची माहिती मिळेल. आगामी काळात शहराच्या विकासात लाॅजेस्टिक क्षेत्र महत्वाची भुमिका वठवणार आहे. मनपा हद्दितील ट्रक टर्मिनल सीएसआर निधितुन विकसित करावा अशी ट्रान्सपोर्ट असोशिएशनची मागणी आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची देशातील सर्व शहरात टर्मिनल उभारावे अशी भुमिका आहे. येणार्या काळात राज्यशासनाकडे टर्मिनल उभारणीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन खा.हेमंत गोडसे यांनी दिले.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजीत चार दिवसीय ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे खा.गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविक करताना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी सारथी सुविधा केंद्रांची आवश्यकता किती महत्वाची आहे याकडे लक्ष वेधले. आॅटो लाॅजेस्टिक एकस्पो आयोजन त्यासाठी गरजेचा अाहे.
सायकल ते ट्रेलर विकास कसा झाला हे या ठिकाणी पहायला मिळेल. समाजच्या वाहकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनधीनता आहे. त्यातून सुटका होण्यासाठी सुविधा केंद्र गरजेचे आहे. या ठिकाणी पार्किंग. आराम, स्वच्छता गृह, या व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान ट्रेनिंग कक्ष अशी सुविधा असलेले सारथी केंद्र गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. खा.गोडसे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेला वंदन करण्यात आले.
चालकांच्या हस्ते फित कापून उद्घाटन
एक्स्पो हा वाहनचालकांना केंद्रस्थानी ठेवत आयोजित करण्यात आला आहे. त्याची झलक उद्घाटनावेळी पहायला मिळाली. खा.गोडसे व आ.हिरे यांच्यासोबत ज्यांनी मागील पन्नास वर्षापासून चालक म्हणून सेवा दिली ते मेहबूब पठाण व किसन पवार यांच्या एक्स्पो उद्घटानाची फित कापण्याचा मान देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply