अहमदनगर, 17 मे (हिं.स.):- नगर शहराच्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे.नागरिकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे.मनपाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात कामे होत आहे.परंतु ज्या ठिकाणी निधी अभावी कामे ठप्प आहे.अशा ठिकाणी आमदार निधीच्या माध्यमातून तेथील कामांना चालना देण्याचे काम सुरु आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहेत. भविष्यकालीन विचार करुन सिमेंट काँक्रीटीचे रस्ते तयार होत असल्याने नगर शहर खड्डेमुक्त होत आहे.त्यामुळे शहरात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदल आहे.विकसित शहराकडे वाटचाल सुरु झाली आहे.प्रभाग ११ हा मोठा असल्याने या भागातील विकास कामांसाठी नगरसेवक घेत असलेला पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागली आहे.यापुढील काळातही आपण स्वत: लक्ष देऊन उर्वरित कामे मार्गी लावू,असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग ११ मधील सारसनगर परिसरातील तुळजाभवानी कॉलनी येथे नगरसेवक अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले,प्रभाग ११ मधील विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वोतोपरि सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहे.नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविले जात आहे.आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील मोठ-मोठे प्रश्न मार्गी लागले आहेत.आदर्श प्रभागाकडे वाटचाल सुरु आहे.नागरिकांच्या सहकार्याने प्रभागात जास्तीत जास्त कामे करण्यावर आपला भर असल्याचे सांगितले.
या प्रसंगी शामकुमार जाखोटिया म्हणाले,आमदार संग्रामभैय्या जगताप व नगरसेवक अविनाश घुले यांनी नागरिकांच्या सोयी-सुविधांबाबत जागृत राहून प्रभागातील अनेक कामे मार्गी लावली आहेत.सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असतात,असे सांगितले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply