नाशिक, १६ मे (हिं.स.) : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गेल्या १२ मे रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले होते की हे सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचे कोणतेही आदेश अधिकाऱ्यांनी पळू नका नाहीतर तेदेखील अडचणी देतील अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते याची गंभीर दखल घेत नाशिक पोलिसांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे संजय राऊत यांना या प्रकरणांमध्ये अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती दरम्यान मंगळवारी नाशिक मध्ये एका विवाह सोहळ्याला नाशिक मध्ये येणार होते त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती दरम्यान दुपारच्या वेळेस नाशिकच्या न्यायालयामध्ये खासदार संजय राऊत यांच्या वतीने अटकपूर्व जामीन्यासाठी अर्ज करण्यात आला होता त्यांचा अटकपूर्व जामीन हा न्यायालयाने मंजूर केला आहे त्यानंतर सायंकाळी उशिरा संजय राऊत हे नाशकात दाखल झाले आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply