नवी दिल्ली, 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 136 जिंकत सर्वत मोठा पक्ष बनला आहे. या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा ! असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेय.
कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा असून बहुमतासाठी 113 जागांची गरज असते. या निवडणुकीत काँग्रेस 136 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर भाजप 65, जनता दल सेक्युलर (जेडीएस) 19 आणि इतर 4 जागांवर विजयी झाले आहेत. या निवडणीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा ! असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केलेय. यासोबतच त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहे. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो, असे मोदी म्हणालेत. तसेच आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू, असे ट्विट मोदींनी केले आहे आणि भाजपलाही पुढील वाटचालीसाठी बळ दिले आहे.
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे आणि काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील या विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. यावेळी कर्नाटकात सत्तेत आलेल्या काँग्रेसला एक सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. दक्षिणेतील एकमेव आणि मोठे राज्य असलेल्या कर्नाटकातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः कर्नाटकात 20 हून अधिक जाहीर सभा घेतल्या होत्या, बरेच रोड शो केले होते. परंतु, कर्नाटकात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply