Home राजकारण रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठतर्फे पाणपोईचे उदघाटन

रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठतर्फे पाणपोईचे उदघाटन

रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठतर्फे पाणपोईचे उदघाटन

चंद्रपूर 15 मे (हिं.स.) : भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हे पुण्याचे कार्य आहे. प्रत्येक धर्माने हीच शिकवण दिली आहे. समाजातील गरजूंना लाभ व्हावा, या उद्देशातून सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठच्या वतीने सुरू करण्यात आलेली पाणपोई हा सामाजिक उपक्रमाचाचा भाग आहे. या पतसंस्थेने तहानलेल्या पाणी उपलब्ध करून देत महान कार्य केले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे (शहर-ग्रामीण) जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी चंदाताई वैरागडे यांनी, रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठच्या वतीने समाजातील गरजुंसाठी विविध उपक्रम राबविले जातात. बाबुपेठ परिसरात कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील नागरिकांना भर उन्हात कामासाठी बाहेर पडावे लागते. चंद्रपूर शहराचे तापमान मागील काही दिवसांत ४० अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे परिसरातील कामगारांसह रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, या उद्देशातून पतसंस्थेच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.