Home राजकारण नाशिक : डॉ.अजय भूसरेड्डी राज्य उपाध्यक्ष पदी बिनविरोध

नाशिक : डॉ.अजय भूसरेड्डी राज्य उपाध्यक्ष पदी बिनविरोध

नाशिक, 15 मे (हिं.स.) – येथील विख्यात दंतरोग विशेषज्ञ व एम.जी .वी. के .बी .एच डेंटल कॉलेजचे प्राध्यापक डॉ.अजय भूसरेड्डी यांची इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडीसिन व रेडिओलॉजी या संस्थेच्या महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नुकत्याच नवी मुंबई येथे झालेल्या परिषदेत हि निवड करण्यात आली.

डॉ.अजय भूसरेड्डी यांनी महाराष्ट्र राज्य डेंटल कौन्सिल,इंडियन डेंटल असोसिएशन अशा विविध संस्थांवर विविध पदे भूषविली असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.त्यांना दंतवैद्यक शास्त्रात योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांनी अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर ट्रस्टचे सरचिटणीस डॉ.प्रशांत हिरे व समन्वयक डॉ.अपूर्व हिरे यांनी अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.