करीमनगर, 15 मे (हिं.स.) : देशात लवकरच समान नागरी संहिता लागू केली जाईल आणि बहुपत्नीत्व संपुष्टात येईल असे मत आसामचे मुख्यमंत्री हिमंती बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले. ते रविवारी तेलंगणाच्या करीमनगर येथे आयोजित हिंदू एकता यात्रेला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की ते 4 महिलांशी लग्न करू शकतात. ही त्याची विचारसरणी होती. पण, मी म्हणतो की आता तुम्हाला 4 विवाह करता येणार नाहीत. आता ते दिवस संपुष्टात येत आहेत. देशात समान नागरी संहिता (युसीसी) येणार आहे आणि भारताला खरे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्याची वेळही आली आहे.
सरमा यांनी अलीकडेच सांगितले होते की, आसाम सरकारने बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी कायदा करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या विधान क्षमतेची तपासणी करण्यासाठी 4 सदस्यीय तज्ञ समिती स्थापन केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे नाव न घेता शर्मा म्हणाले की, ‘राजाचे फक्त 5 महिने शिल्लक आहेत. तेलंगणात ‘रामराज्य’ हवे आहे आणि तेच आमचे ध्येय आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply