Home राजकारण काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत हल्ला प्रकरणी ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत हल्ला प्रकरणी ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत हल्ला प्रकरणी ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर 12 मे (हिं.स.)- जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मूल शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक आक्रमक झाले असून काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. दरम्यान, आरोपीला ४८ तासांत अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तसेच या हल्ल्या मागे मुख्य सूत्रधार कोण.. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून ४८ तासाच्या आत आरोपी व मुख्य सूत्रधार यांना बेड्या ठोकाव्या अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याची घटना जिल्ह्यात प्रथमतः घडलेली असून पोलीस विभागामार्फत या गंभीर घटनेची कसून चौकशी करून हल्लेखोर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.