नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिन आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या राज्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मेहनती लोकांचे वरदान लाभले असून विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे राष्ट्राच्या प्रगतीत मोठा हातभार लागला आहे. आगामी काळातही महाराष्ट्राची प्रगती अशीच होत राहावी, यासाठी मी प्रार्थना करतो.”
गुजरात स्थापना दिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “गुजरात स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गुजरातने आपल्या सर्वांगीण प्रगतीमुळे, तसेच आपल्या अनोख्या संस्कृतीमुळे ठसा उमटवला आहे. आगामी काळातही राज्याने विकासाची नवीन उंची गाठावी, अशी मी प्रार्थना करतो.”
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply