नवी दिल्ली, 4 मे (हिं.स.) : भारतातील जपानच्या दुतावासाने मन की बातच्या 100 व्या भागाबद्दल ट्वीट केले आहे. या प्रसंगी शुभेच्छा देताना दुतावासाने जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांनी ‘मन की बात : रेडीओवरील एक समाजिक क्रांती’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेला संदेश उधृत केला आहे.
दुतावासाने मन की बातच्या 89 व्या भागाचा देखील उल्लेख केला आहेत, ज्यात पंतप्रधान मोदींनी आशियातील देशांत जपानी कलाकार सादर करत असलेल्या महाभारत आणि रामायण यांचा दाखला देत भारत – जपान सांस्कृतिक संबंधांची प्रशंसा केली होती.
या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले, “या प्रेमळ संदेशासाठी आपले आभार आणि माझे मित्र, दिवंगत शिंजो आबे यांचे स्मरण केल्याबद्दल देखील.”
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply