चंद्रपूर 7 एप्रिल (हिं.स.) :- चंद्रपूर, भांदक, वरोरा व माजरी या स्थानकांवर रेल्वे प्रवाश्यांच्या सोयी साठी अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्याच्या मागणी सह अन्य अनेक महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन खा. बाळू धानोरकर यांनी रेल्वे बोर्ड चेयरमन अनिलकुमार लाहोटी यांना दिले. या भेटीत अनेक महत्वपूर्ण समस्या व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
दक्षिण-मध्य, मध्य व दक्षिण-पूर्व-मध्य या रेल्वे झोनला जोडून असलेल्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जुन्या चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाच्या 60 एकर रिक्त जागेत चंद्रपूर रेल्वे जंक्शन ची निर्मिती करणे, बल्लारपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स ट्रेन ला सी.एस.टी. पर्यंत वाढवून दररोज चालविणे, काझीपेठ-पुणे एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून तीन वेळा चालविणे, सिकंदराबाद ते कागजनगर चालणारी भाग्यनगरी ट्रेनला बल्लारपूर पर्यंत आणण्यास रेल्वे मंत्र्यांनी होकार दिला असून याची त्वरित अंमलबजावणी करणे, डेमू ट्रेन बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६ वा. सोडणे, राजुरा-आसिफाबाद रोड वरील अंडरपास करणे, चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पांडेचेरी-नई दिल्ली ट्रेन त्रिचापल्ली-भगतकी कोठडी ट्रेन, यशवंतपूर-लखनऊ, मदुराई-चंडागढ़ ट्रेन, यशवंतपूर- निजामुद्दीन, तिरुवतंपूर- निजामुद्दीन, ऐर्नाकुलम-निजामुद्दीन, कन्याकुमारी-निजामुद्दीन या रेल्वे गाड्यांचा थांबा देणे, त्याचप्रमाणे भांदक रेल्वे स्थानकावर मद्रास जम्मुतावी एक्सप्रेस, तसेच जबलपूर-चांदा फोर्ट एक्स्प्रेस बल्लारपूरपर्यंत वाढविणे आणि सौंदड, अंर्जुनी, वडसा, नागभीड आणि मूल-मारोडा येथे थांबा देणे, इत्यादी मागण्या खा. बाळू धानोरकर यांनी केल्यात.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply