हावडा, 30 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केल्याची दुर्दैवी घटना घडली. रामनवमीची मिरवणूक विशिष्ठ धर्मियांच्या परिसरातून जात असताना हा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झालेत.
हिंसाचार व जाळपोळीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमी सण शांततेत साजरा करण्याचे आणि मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. राज्यात पोलीस दलही सतर्क होते. असे असूनही हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली आहे. या गोंधळात अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply