नवी दिल्ली, 29 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मी माझ्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा देते.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांची जयंती म्हणून साजरी करण्यात येणारा हा आनंद आणि समृद्धीचा उत्सव आपल्याला निःस्वार्थ सेवेचा संदेश देतो आणि प्रेम, करुणा, मानवता आणि त्यागाचा मार्ग अंगिकारण्याची प्रेरणा देतो. प्रभू रामाचे जीवन हे कृपा आणि त्यागाचे उदाहरण आहे आणि ते आपल्याला सन्माननीय आणि शिस्तबद्ध जीवन जगण्यास शिकवते.
आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाचे आदर्श आत्मसात करूया आणि भारताला एक गौरवशाली राष्ट्र बनवण्यासाठी स्वतः झोकून देऊन काम करूया.”
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply