मुंबई
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या रूपाने एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला आहे अशा शब्दांत भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी शोक व्यक्त केला
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात कोणी कार्यकर्ता बनायला तयार नव्हतं तेव्हापासून गिरीश बापट पक्षासाठी उभे होते. आज पक्षाला मोठं जन समर्थन मिळत असतानाही ते आपल्या सोबत कायम होते. त्यांनी मोठा प्रवास ‘याची देही याची डोळा’ असा पाहिला. ते स्वतः एकनिष्ठ ध्रुव ताऱ्यासारखे राहिले. गिरीश बापट सांस्कृतिक कार्यमंत्री होते; त्यावेळी सभागृहाच्या कामांमध्ये त्यांनी आम्हा सर्व नवीन आमदारांना मार्गदर्शन केले. त्यांनी उभारणीच्या सुरुवातीच्या काळात केलेल्या भरीव मदतीमुळे आज मी उभा राहू शकलो. ते सर्वांना मदतीसाठी कायम तत्पर असायचे. त्यांनी पुण्याहून आणलेली भाकर सगळ्यांसाठी असायची. पुण्यात त्यांच्या घरी गेल्यावर जुने किस्से सांगून ते आठवणीत रमायचे. त्यांच्यासोबत घालवलेले सगळे प्रसंग आजही डोळ्यासमोर उभे राहतात. कसब्याच्या पोटनिवडणुकीत स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता पक्षासाठी आवश्यक ते सगळं त्यांनी केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. आमच्या सगळ्यासाठी हे खूपच दुःख देणारे आहे अश्या शब्दात आ. ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मीडिया प्रभारी
मुंबई भाजपा कार्यालय
Leave a Reply