संजय राऊत यांना अटक का नाही?
मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव की अमृत महोत्सव याची माहिती नाही, मी जर त्याठिकाणी असतो तर कानाखाली लावली असती, असे विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.
या विधानावरून तेव्हा वादळ माजल्यामुळे मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती.
कोणी कितीही मोठा असला तरीही या देशात कायदा हा सर्वांसाठी समान आहे. हे नारायण राणे यांच्या आटकेतून दिसून आले होते.
आता हाच न्याय लावला तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अर्वाच्य शब्दप्रयोग करून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
संजय राऊत यांनी सध्याचे मुख्यमंत्री “चाटूगिरी” करीत असल्याचा आरोप करून अर्वाच्य शब्दप्रयोग केला होता.
मात्र, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही संजय राऊत यांना अजूनही अटक का केली जात नाही, याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकी संयमशीलता का पाळत आहेत? असा सवालही आता विचारला जात आहे.
Leave a Reply