उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवल चा शेवटच्या दिवशी परफॉर्मन्स सादर करण्यासाठी प्रसिद्ध गायक सोनू निगम चेंबूर फेस्टिवल ला आला होता. कार्यक्रम संपवून सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना पाठीमागून त्याला प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने पकडलं त्यावेळी सोनू निगम यांचे दोन साथीदार यांनी त्याला अडवले असता त्याने दोघांनाही पायऱ्यावरून खाली धक्काबुक्की करत ढकलून दिलं. यात सोनू निगम ही पायऱ्यांवर पडला. मात्र, यामध्ये सोनू निगमच्या एका साथीदाराला धक्काबुक्कीत डोक्याला मार लागला. यावेळी चेंबूर मधील झेन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सोनू निगम यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी यासंदर्भात आयपीसी कलम 341, 337 अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. यावेळी चेंबुर पोलीस स्थानकात आमदार प्रकाश फातर्फेकर आणि त्यांची मुलगी माजी नगरसेवक सुप्रदा फातर्फेकर आले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सोनू निगम, गायक हेमराज राजपूत, Dcp
Famous singer Sonu Nigam filed a complaint against Swapnil Phakar, son of MLA Prakash Phakar, after being pushed down the stairs by him following a performance at the Chembur Festival. Sonu Nigam’s two companions were also reportedly involved in the incident. One of them was hit on the head. Prakash Phakar and his daughter Suprada Phakar have declined to comment on the matter when they visited the Chembur police station.
Leave a Reply