Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून 'अक्षय तृतीया', 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे चालू राहतात. असा हा सकारात्मक ऊर्जा देणारा सण आहे.

मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो. उपवासाच्या व्रतानंतर येणारा ‘ईद-उल-फित्र’ संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो.

या दोन्ही सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी. विविध क्षेत्रातील नवनव्या योजना, प्रकल्प यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त व्हावा, हीच मनोकामना. सर्वांना अक्षय तृतीया आणि ईदच्या मनापासून शुभेच्छा.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.