Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’चे वाटप

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’चे वाटप

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने 'आनंदाचा शिधा'चे वाटप

ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) गुढीपाडव्यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते कोपरीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने सर्वसामान्यांचे सण आनंदात जावेत, यासाठी ‘आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत ठाणे शहरातील नागरिकांना आनंदाचा शिधावाटप करण्यास आज कोपरी येथे सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला शिधावाटप विभागाच्या मुख्य अधिकारी सौ. सुरेखा चव्हाण, श्री. शेवाळे, भाजपा स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, प्रमोद चव्हाण, शिवाजी राजकर, संजय लाड,रायलादेवी मंडळ अध्यक्ष भूषण पाटील, सचिव राजेश गाडे आदींची उपस्थिती होती.

या उपक्रमाबद्दल ठाण्यातील नागरिकांनी शिवसेना-भाजपा युतीचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.