Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन  १९ जून रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

 १९ जून रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

 १९ जून रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

ठाणे, 19 मे (हिं.स.) नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरिय लोकशाही दिनाच्या धर्तीवर, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर महिन्याच्या तिस-या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यानुसार, १९ जून रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी १५ दिवस आधी म्हणजे ५ जून पूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत.

परिमंडळ १ – (कळवा, मुंब्रा, दिवा प्रभाग समिती अंतर्गत) उपायुक्त कार्यालय, कळवा प्रभाग समिती कार्यालय, कळवा

परिमंडळ २ – (नौपाडा, वागळे प्रभाग समिती अंतर्गत, उपायुक्त कार्यालय, नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे (प.)

परिमंडळ ३ – (उथळसर, वर्तकनगर, लोकमान्य. सावरकरनगर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत) उपायुक्त कार्यालय, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे (प.)

नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार १५ दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.