Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

रत्नागिरी, 17 मे, (हिं. स.) : शासन आपल्या दारी, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यात हजारो दाखल्यांचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या २५ मे रोजी रत्नागिरीत या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे.

नागरिकांना प्रलंबित दाखले तातडीने देता यावेत, यासाठी ”शासन आपल्या दारी” ही नवी योजना राज्य शासनाने सुरू केली असून, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यातही हजारो दाखले दिले जाणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमासाठी प्रयत्न केले आहेत. रत्नागिरीत येत्या २५ मे रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रशासनातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी ही नवी योजना १३ मेपासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात या योजनेचा आरंभ झाला. या योजनेतून विविध योजनांचे प्रलंबित दाखले तातडीने दिले जाणार आहेत. त्यानुसार २५ विविध योजनांमधून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७५ हजार दाखल्यांचे वाटप होणार आहे. राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांचा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये होणार आहे. पालकमंत्री सामंत यांनी या योजनेचा कार्यक्रम रत्नागिरीत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार प्रशासनानेही याची तयारी सुरू केली असून, विविध विभागांच्या बैठका आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.