Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन पुण्यात महिलांसाठी द केरल स्टोरी चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

पुण्यात महिलांसाठी द केरल स्टोरी चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

पुण्यात महिलांसाठी द केरल स्टोरी चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

पुणे , 14 मे (हिं.स.) सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपक्रम घेतला आहे.

कोथरुडमधील दहा हजार पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी हा सिनेमा पाहिला आहे.

समाजातील ज्वलंत विषय मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. द केरला स्टोरीज हा असाच समाजातील ज्वलंत विषय मांडणारा सिनेमा असून, सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला आहे. हजारो तरुणी आणि तरुणी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. कोथरूड मतदारसंघातील सर्व महिलांना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांत पाच हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहिला आहे

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.