Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, 13 एप्रिल (हिं.स.) : राज्यपाल रमेश बैस यांनी आज, गुरुवारी सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राज्यपाल बैस बुधवारी नागपूर दौऱ्यावर पोहचलेत. त्यानंतर गुरुवारी सकाळी ते दीक्षाभूमीला गेलेत. यावेळी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतल्यानंतर राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे आदींनी स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.