Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन धाराशिवमध्ये महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’ चा मोफत शो !

धाराशिवमध्ये महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’ चा मोफत शो !

धाराशिवमध्ये महिलांसाठी 'द केरला स्टोरी' चा मोफत शो !

धाराशिव, 8 मे (हिं.स.) :‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा शहरातील श्री टॉकीजमध्ये मोफत शो रविवारी (दि.7) आयोजित करण्यात आला. दुपारी 12 ते 3 आणि 3 ते 6 अशा दोन्ही वेळच्या शोला महिला व युवतींची तुफान गर्दी झाली होती. चित्रपटाच्या कथानकाबाबत देशभरातील राजकीय नेत्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिलांनी मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पहावयास मिळाले.

देशात 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे कथानक हिंदू, ख्रिश्चन धर्मातील महिला व युवतींचे धर्मांतरण करुन त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या सत्य घटनेवर आधारित असल्याचा चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे. त्यावरुन राजकीय क्षेत्रात दररोज दावे-प्रतिदावे केले जात असल्याने चित्रपट मात्र तुफान गर्दी खेचत आहे. तर काही ठिकाणी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे रविवारी धाराशिव येथील रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी या चित्रपटाच्या दोन शोचे मोफत आयोजन श्री टॉकीजमध्ये केले होते. दोन्ही शोज्ना महिला व युवतींची तुफान गर्दी पहावयास मिळाली. चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिला व युवतींनी चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देऊन प्रत्येक महिला व मुलीने हा चित्रपट पहायला हवा असे मत व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.