Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन राष्ट्रपती मुर्मू दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर

राष्ट्रपती मुर्मू दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर

राष्ट्रपती मुर्मू दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर

नवी दिल्ली, 6 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 6 ते 8 एप्रिल या कालावधीत आसाम दौऱ्यावर आहेत.

7 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करतील. नंतर गुवाहाटी येथे त्या माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवतील. त्याच दिवशी, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील.

8 एप्रिल रोजी राष्ट्रपती, तेजपूर एअर फोर्स स्टेशनवर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानातून उड्डाण करतील.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.