Home मराठी बातम्या पर्यटन आणि मनोरंजन कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांनी घट केली आहे. तर, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे.

गेल्या माहिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आजपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी घट करण्यात आली आहे. दिल्ली आजपासून 19 किलो एलपीजी व्यावसायिक सिलेंडर 2 हजार 28 रुपयांना मिळणार आहे. तसेच कोलकाता 2132, मुंबई 1980 आणि चेन्नईमध्ये 2192 रुपये इतकी किंमत असेल. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1003 रुपये आहे. तसेच कोलकातामध्ये 1129 रुपयांना उपलब्ध असेल. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1102 रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1119 रुपये मोजावे लागतील.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.