Home मराठी बातम्या आंदोलने आमदार संजय शिरसाटांविरोधात महिला आघाडी रस्त्यावर

आमदार संजय शिरसाटांविरोधात महिला आघाडी रस्त्यावर

आमदार संजय शिरसाटांविरोधात महिला आघाडी रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.) :शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा नुकताच शहरांमध्ये पार पडला. या मेळाव्यात आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी अश्लील अपशब्द वापरले. याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी मंगळवारी दि.28 मार्च रोजी थेट रस्त्यावर उतरली. क्रांतीचौकात जोडे मारो आंदोलन करत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान संजय शिरसाट यांच्या प्रतिमेमधील तोंडाला शेण लावून, त्याचप्रमाणे यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी आपला संताप व्यक्त केला. महिलांचा अवमान करणारे शिंदे सरकार हाय हाय, संजय शिरसाट हाय हाय, संजय शिरसाटांच करायचं काय खाली मुंडक वर पाय, पन्नास खोके खाऊन खाऊन माजलेत बोके अशा विविध घोषणांनी महिलांनी क्रांतीचौक परिसर दणाणून सोडला. महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. आम्ही महिला हे कदापिही सहन करणार नाही, याहीपेक्षाही तीव्र आंदोलन करू, आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत घडलेल्या शिवसेनेच्या रणरागिणी आहोत, वेळ पडली तर त्यांच्या तोंडाला देखील काळे फासायलाही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा प्रतिभा जगताप यांनी दिला. या आंदोलनप्रसंगी उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, दुर्गा भाटी, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, अशा दातार, सुनिता सोनवणे, मीरा देशपांडे, मीरा पाटील, सुचिता आंबेकर, सुकन्या भोसले, सारिका शर्मा, लता त्रिवेदी, मीना थोरवे, विद्या खाडीलकर, स्मिता रामचंद्र, छाया जाधव, मीनल राणे, सविता आंभोरे, विमल आव्हाड, शोभा बडे, कांता गाडे, इंदिरा कदम आदी उपस्थित होत्या. जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी म्हणाल्या की, शिंदे सरकारमधील मंत्री व लोकप्रतिनिधी कायम महिलांबाबत अपशब्द वापरताना दिसतात. याआधीही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले होते. तसेच याआधी सुषमा अंधारे यांच्याविषयी मंत्री गुलाबराव पाटील यांनी, तर आता परत सुषमा अंधारे यांच्याविषयी संजय शिरसाट यांनी अश्लील भाषेत गरळ ओकली आहे, हे आम्ही महिला कदापिही सहन करणार नाही.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.