Home मराठी बातम्या आंदोलने माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे

माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे

माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे

मुंबई, 22 मार्च (हिं.स.) : माहिमच्या खाडीत अनाधिकृत दर्ग्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम महिनाभरात हटवण्यात यावे. अन्यथा एक महिन्यानंतर याठिकाणी गणपती मंदिर उभारले जाईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे आयोजित मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या सभेत माहिम खाडीमधील दर्ग्याच्या अवैध बांधकामाचा व्हिडीओ दाखवला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राज्यकर्ते, प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या असे आवाहन राज यांनी केले. माहिमच्या समुद्रातील हा दर्गा गेल्या दोन वर्षात (महाविकास आघाडीच्या काळात) उभा झाल्याचे सांगत त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिनाभरात या अवैध दर्ग्यावर कारवाईचे अल्टीमेटम दिले. यावेळी मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्यावरून पु्न्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मागील मविआ सरकारने भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या 17 हजार मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ते काढतो असेही राज ठाकरे यांनी सांगीतले. यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले. तसेच नारायण राणेंच्या पक्षत्यागाचा प्रसंग आणि घडामोडींची देखील सविस्तर माहिती दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.