Home मराठी बातम्या आंदोलने मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देऊ – मिलींद परांडे

मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देऊ – मिलींद परांडे

मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देऊ – मिलींद परांडे

नागपूर, 17 मे (हिं.स.) : हिंदूंचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात शनिवारी रात्री मुस्लिम तरुणांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे ते अपयशी ठरले. मागील वर्षीही असाच असफल प्रयत्न झाला होता. यापुढे हिंदुंच्या मंदिरात कोणी अशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास हिंदु समाजाकडून सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद पांडे यांनी दिला.

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी गर्भगृह तथा पवित्र परिसरात कुठेही गैरहिंदूंना मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे म्हणून प्रवेशबंदी आहे. तसेच शिरकाव करण्याची अनुमती नाही. देशभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अनेक मंदिरांमध्ये मुस्लिमांकडून विवाद उत्पन्न करण्याचा व कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जिहादी मानसिकतेचा इतिहास बघता केवळ मंदिरच नव्हे तर हिंदूंच्या मालमत्तेवर विवाद उत्पन्न करून कब्जा करण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहेत. हे एक मोठे कारस्थान असावे असे वाटते. याच कारस्थानाचा भाग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिरात हा वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरकाव करण्याचा असा प्रयत्न करणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमान युवकांवर गुन्हे दाखल करून व अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद करित आहे. हिंदू समाज अशाप्रकारच्या मंदिरात शिरकाव करण्याच्या, मालमत्तेवर कब्जा करण्याच्या सर्व प्रकारांचा, कारस्थानांचा जबरदस्त विरोध करेल व सडेतोड उत्तर देईल. अशा घटना भविष्यामध्ये घडू नयेत, समाजाची शांती भंग होऊ नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता शासन व प्रशासनाने जबाबदारीने लक्ष घालून अनर्थ टाळावा अशी अपेक्षा परांडे यांनी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.