Home मराठी बातम्या भ्रष्टाचार मुंबईसह गुजरातमध्ये ‘इन्कम टॅक्स’ची धाड, शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप

मुंबईसह गुजरातमध्ये ‘इन्कम टॅक्स’ची धाड, शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप

मुंबईसह गुजरातमध्ये 'इन्कम टॅक्स'ची धाड, शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह गुजरातमधील वापी शहरात आज, मंगळवारी आयकर विभागाने मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली. सुमारे 350 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप या मिलवर आहे

यासंदर्भातील माहितीनुसार आयकर विभागाने गुजरातमधील वापी आणि मुंबईतील शाह पेपर मिल जवळील १८ जागांवर छापेमारी केली आहे. यामध्ये त्यांना 2 करोड रोख रक्कम आणि तितक्याच रक्कमेचे दागिने हाती लागले आहेत. या कंपनीवर सुमारे 350 कोटी रुपयांहून अधिक कर चोरीचा आरोप आहे. तसेच या कंपनीवर गेल्या 5 ते 6 वर्षांपासून गैर व्यवहार आणि कर चोरीचा आरोप आहे. आयकर विभागाचा तपास पूर्ण झाल्यावर योग्य रक्कम समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.