Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया जालना – जिल्हाधिका-यांकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा योजनेचा आढावा

जालना – जिल्हाधिका-यांकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा योजनेचा आढावा

जालना - जिल्हाधिका-यांकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा योजनेचा आढावा

जालना, 7 एप्रिल, (हिं.स.) वित्तीय सेवा विभागामार्फत 1 एप्रिल ते 30 जून 2023 या कालावधी देशभरातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतस्तरावर जन सुरक्षा योजनेसाठी जनसंपर्क मोहिम राबविली जात आहे. पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेत सहभागी करुन घेत विमा सुरक्षा प्रदान करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेबाबत आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, नाबार्ड बँकेचे श्री. क्षीरसागर, ग्रामीण बँक व्यवस्थापक श्री. कुलकर्णी यांच्यासह जिल्हा बँकेचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.