Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे – भाजपला धुतले!

खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे – भाजपला धुतले!

खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे - भाजपला धुतले

माननीय पक्षप्रमुख श्री उध्दवसाहेब ठाकरे यांची खेड येथील जाहीर सभा दिनांक ५ मार्च २०२३

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,

अभूतपूर्व दृश्य डोळ्यात न समावणारे आई जगदंबेचे हे रुप. आज तुम्हा देव माणसांचे आशीर्वाद घ्यायाला आलोय. आज माझ्या हातात काही नाही तरी तुम्ही माझ्या सोबत यासाठी पूर्वजांची पुण्याई हवी. भुरटे, गद्दार तोतयांना सांगतो नाव चोराल पण शिवसेना नाही चोरु शकत नाही. निवडणुक आयुक्तांना सांगतो मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना बघायला या. सत्तेचे गुलाम चुना लावा आयोग. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयुक्ताच्या वडिलांनी नाही माझ्या वडिलांनी केली. तुम्ही मराठी, हिंदूंच्या एकजटीवर घाव घालतात. भाजपला गल्लीतले कुत्रे विचारत नव्हतं. ज्यांनी सोबत दिली आज त्यांना संपवायला निघालेत त्यांनी प्रयत्न करुन बघावे.

निवडणुक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नाव चांगलय गोळीबार मैदान. ही ढेकण चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना कुटुंबीय मानल त्यांनीच आपल्यावर वार केले. शिवसेना नसती तर आज आपण कोण असतो? त्यावेळेला किशोर कानडे, वामनराव सगळे होते. सगळ्यांची आठवण.

आपण अंधेरी जिंकलो. नाव चिन्ह घेऊनही आपण जिंकलो. यांच्यात अनेक असे ज्यांनी बाळासाहेबांना बघितले पण नाही ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नौकरी, उद्योग बाहेर जाऊ देणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. एक काळी टोपी वाला होता गेला. महाराजांचा, सावित्री बाईचा अपमान केला गद्दारांच्या शेपट्या आतच. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते.

मी घरात बसून पण महाराष्ट्र सांभाळला तुम्ही दिल्ली समोर मुजरे करत बसलात. माझ्या सोबत महाराष्ट्र होता. आपल जागतिक कौतुक झाले ते माझे नाही महाराष्ट्राचे कौतुक. गुजरातच्या निवडणुका म्हणून महाराष्ट्रातले उद्योग पाठवले. फक्त तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. यांना शरम नाही सुविधा नाही. महाराष्ट्र हे माझे कुटुंब म्हणूनच माझ कुटुंब माझी जबाबदारी आहेच. ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलले तो गतिमान महाराष्ट्र नकोय.

रेवस रेड्डी चार पदरी देण्यात आपण यशस्वी ठरलो. तौक्ते वादळ केंद्राचे निकष कमी आपण जबाबदारी घेतली. वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा उपक्रम. सगळ व्यवस्थित सुरु होत. सगळ्या आमदारांचा उल्लेख. राजन साळवींचा छळ सुरु ते देशद्रोही नाहीत. देशद्रोही कसे म्हणता? मग सारवासारव करतात. १९९२-९३ साली मुंबई वाचवणारे यांना देशद्रोही वाटतायत. केजरीवाल भेटीचा उल्लेख. एक पत्र लिहिलय पंतप्रधानाना लोकांच्या प्रश्न विचारलाय. केंद्रीय यंत्रणांच्या बाबतीत तक्रार. तुमच्या पक्षात घेतले की ते स्वच्छ होतात. विरोधी पक्षात असले की गुन्हेगार. पूर्वी यांच्या व्यासपीठावर साधू दिसायचे आता संधीसाधू दिसतात. संपत सरल कवि यांचा उल्लेख.

छत्रपती शिवाजी महाराजांची एक घटना. जाणाता राजा आवर्जून बघा. जेव्हा आम्ही महाराजांचा जयजयकार करतो तेव्हा प्रेत पण जागे होतील इतकी त्यात शक्ती असे आम्ही मानतो. अफझलखानाला सामील व्हा असा कान्होजी जेधे देशमुखांना पण खालिता. कान्होजी पाचही मुलांना घेऊन महाराजांकडे. हीच खरी वेळ कान्होजी कोण आणि खंडोजी खोपडे कोण बघायची. जेधेंनी महाराजांना सांगितले मी सगळ्यावर पाणी सोडले पण स्वराज्याशी द्रोह नाही. आज खंडोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसतात. मोगँबो खुश हुआ लढवत ठेवायचे ते खात राहतात. राजन, वैभवची काय संपत्ती आहे? यांच्या मागे लागता. मी बाळासाहेबांचा पुत्र आहे ठाकरेंची सहावी पिढी अभिमानाने काम करतेय. कसब्यात साफ झाले. अंधेरीत तर लढायची हिंमत नाही झाली. मेघालयात शहांनी संगमांवर जोरदार आरोप केले. निकालात संगमांनी यांना चित केले. घराणेशाहीचे, भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांच्या सोबत सत्ता स्थापन करताहेत. भाजपने संगमांचे काय चाटले?

त्यांना भगवे तेज संपवायचे आहे. मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणुक आयोग नाही. चोरांना आशीर्वाद देणार का? मिंधेच्या हातत धनुष्यबाण पण मिंधेचा चेहरा पडलेला. मेरा खानदान चोर है हे कधीच पुसले जाणार नाही. आपण महाराष्ट्राची सेवा केली. कोकण आपला प्राण. सत्ता गेली तेव्हाही १९९७ मध्ये कोकणाची साथ शिवसेनाप्रमुख नतमस्तक झाले.

सिब्बल बैचेन आहेत शेवटी ते जे बोलले ते संविधाना, स्वातंत्र्य धोक्यात आलय. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही ते सत्तेवर बसून हे सगळ करताहेत. नक्षलवाद्यांशी लढणारे कोकण सुपुत्र सुर्वे यांचे कौतुक. गोमूत्र शिंपडून स्वातंत्र्य नाही मिळाले. १९३० डिसेंबर महिना तीन तरुण विनयचंद्र बोस, दिनेश आणि बादल. कर्नल सिंपसन अत्यंत क्रूर तिघांनी पिस्तुल बाहेर काढून सिंपसनवर टाकल्या. त्या घटनेचा संदर्भ. भाजपला विनयचंद्र बोस नाव तरीही माहिती आहे का? भाजपचे गुलाम होण्यासाठी स्वातंत्र्य योध्दांनी आहुत्या नाही दिला.

मी शून्य त्यामागे बाळासाहेब आहेत म्हणून मला किंमत. गुजरातला पटेल चोरले, बंगाल मध्ये सुभाषबाबू चोरले इकडे बाळासाहेब चोरले. चोराला, या वृत्तीला मत देणार का? तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. जनता जे ठरवेल ते मला मान्य. मी हवा की नको हे तुम्ही ठरवणार निवडणुक आयोग नाही. २०२४ स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही. उद्या शिमगा माझ्या सभेनंतर काही शिमगा करतील. संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपतींचा भगवा आपल्या फडकवायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.