Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

सोलापूर, 4 जून, (हिं.स) सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबीनमध्ये घेऊन बसतात. यापुढील काळात असे होऊ नये, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसमाेर केली. सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले. काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आशीष दुआ, सोनल पटेल, नसीम खान, कुणाल पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार आदी उपस्थित होते.

काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीवरुन सुशीलकुमार शिंदे आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. सोलापुरातील काँग्रेसच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांना कोपऱ्यातील खुर्ची ठेवल्यामुळे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील निघून गेले होते. या वादाचे पडसाद शनिवारी मुंबईच्या बैठकीत उमटले. नरोटे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सकारात्मक वातावरण होते. पुलवामा हल्ल्यानंतर यात बदल झाला.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.