Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया भाजपा महाजनसंपर्क अभियानातंतर्ग ४८ सभा होणार – आ. देवयानी फरांदे

भाजपा महाजनसंपर्क अभियानातंतर्ग ४८ सभा होणार – आ. देवयानी फरांदे

भाजपा महाजनसंपर्क अभियानातंतर्ग ४८ सभा होणार – आ. देवयानी फरांदे

नाशिक, ०३ जून (हिं.स.) : भाजपा महाजनसंपर्क अभियानात राज्यात ४८ सभा होणार नाशिक लोकसभा जनसंपर्क अभियान प्रभारी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे व कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यात या अभियानानिमित्त ४८ जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार देवयानी यांनी शुक्रवारी दिली. भाजपा नाशिक महानगर कार्यालय वसंतस्मृती येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होत्या. यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे, नाशिक जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, माजी महापौर सतिष नाना कुलकर्णी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनिल बच्छाव, पवन भगूरकर, जगन आण्णा पाटील, प्रदेश प्रवक्ते गोविद बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की ना.गिरीष महाजन यांची उत्तर महाराष्ट्र क्लस्टरसाठी अभियान प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

आ.देवयानी फरांदे म्हणाल्या की, ३१ मे ते ३० जून असा सुमारे महिनाभर महाजनसंपर्क कार्यक्रम चालणार आहे. या दरम्यान देशभरात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील १ हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि बूथ स्तरावर आयोजित केले जाणार आहेत. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, २३ जून रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल रॅलीद्वारे देशभरातील 10 लाख बूथवर पक्ष कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि संपर्क साधतील.

यावेळी आ.देवयानी फरांदेंनी सांगितले की ,गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिल्यामुळे जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे. ”अपना परिवार अपना विकास” हे धोरण बदलून ”सबका साथ, सबका विकास”चा नवा अध्याय रचला आहे. पूर्वी योजना , प्रकल्पांची केवळ घोषणा होत असे मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसे. आता पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही एकाच सरकारच्या कालावधीत होत आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा १०० टक्के लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहे.

गेल्या ९ वर्षात सुमारे ४८ कोटी लोकांची जन-धन खाती उघडण्यात आली, उज्ज्वला योजनेंतर्गत 9.5 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप, सुमारे ३.५ कोटी घरांना वीजपुरवठा, ११ कोटींहून अधिक शौचालयांचे बांधकाम, १०कोटीहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ ,सुमारे १२.५ कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा, अशी मोदी सरकारची गेल्या ९ वर्षांतील कामगिरी आहे. राज्यात प्रत्येकी ४ लोकसभा मतदारसंघांचे विभाग करण्यात आले असून या मतदारसंघांत राज्याचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी , उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव ,अनुराग ठाकूर, प्रल्हादसिंह पटेल,अजयकुमार मिश्रा, खा. तीरथसिंह रावत , सदानंद गौडा , मध्य प्रदेशचे मंत्री अरविंद भदुरीया आदी प्रवास करणार असल्याचे आ.देवयानी फरांदे यांनी सांगितले

मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीची विस्तृत माहिती देण्यासाठी 9yearsofseva.bjp.org ही वेबसाइट सुरू केली असून जनसंपर्क आणि अभियानात सहभागी होण्यासाठी भाजपने 9090902024 हा मिस्ड कॉल नंबर देखील सुरु केल्याची माहिती देण्यात आली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.