Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया देशात 3.25 लाख ‘मोदी मित्र’ करणार प्रचार… भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

देशात 3.25 लाख ‘मोदी मित्र’ करणार प्रचार… भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

देशात 3.25 लाख 'मोदी मित्र' करणार प्रचार... भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाच्या मुस्लीम मोर्चातर्फे अशरफ ते पसमांदापर्यंत (उच्चभ्रू ते दुर्बल) पोहचण्यासाठी आगामी 10 मे पासून देशव्यापी अभियान सुरू होतेय. या अभियानंतर्गत 3 लाख 25 हजार मुस्लीम ‘मोदी मित्र’ 65 मुस्लीम बहुल मतदारसंघात पक्षाचा प्रचार करणार आहेत. भाजप मुस्ली मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारच्या मुस्लीम कल्याण योजनांच्या प्रचारासाठी निवडण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश-बंगालचे 13-13, केरळचे – 8, आसामचे सहा, जम्मू-काश्मीर-5, बिहार-4, मध्यप्रदेश -3, महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, तेलंगणा, हरियाणाचे प्रत्येकी 2-3, लडाख, लक्षद्वीप, तामिळनाडूच्या प्रत्येकी एक-एक लोकसभा क्षेत्राचा समावेश असल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. भाजपा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ भेदभाव न होता मुस्लिमांना मिळत असल्याची माहिती दिली जाईल. एका लोकसभा क्षेत्रात 5 हजार मुस्लीम मोदी मित्र असतील. हे प्राचार्य, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासरखे गैरराजकीय व्यक्ती असतील.

भारतीय मुस्लीम जातीच्या तीन गटात विभागले गेले आहेत. जी हिंदूंच्या 4 वर्णांच्या रचनेसारखी आहे. माजी राज्यसभा सदस्य आणि पसमंदा मुस्लिम चळवळीचे नेते अली अन्वर अन्सारी यांच्या मते, पहिल्या वर्गात सय्यद, शेख, पठाण, मिर्झा, मुघल या उच्च जातींचा समावेश होतो. दुसऱ्या वर्गात तथाकथित मध्यम जातींचा समावेश होतो. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामध्ये अनेक जाती आहेत. जसे अन्सारी, मन्सूरी, वर्षा, कुरेशी. तर हलालखोर, हवारी, रज्जाक इत्यादी जाती तिसऱ्या वर्गात येतात.

देशाच्या लोकसंख्येमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 14 टक्के आहे. यापैकी 80 टक्के पसमांदा मुस्लीम आहेत. यामध्ये दलित आणि मागासवर्गीय मुस्लीम येतात. ते सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. हा शब्द मूळ फारसी आहे, ज्याचा अर्थ समाजात मागे राहिलेले लोक असा होतो. भारतातील मागासलेल्या आणि दलित मुस्लिमांना पसमांदा म्हणतात. भारतातील पसमांदा चळवळ 100 वर्षे जुनी आहे. गेल्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मुस्लीम पसमंदा चळवळ उभी राहिली.भाजपाच्या 17 जानेवारी 2023 रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आम्हाला सरकारची धोरणे मुस्लीम समाजातील बोहरा, पसमांदा आणि शिक्षित लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत.

यासंदर्भात सिद्दीकी म्हणाले की, आम्हाला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचायचे आहे आणि त्यांना आपल्याशी जोडायचे आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी 3 जुलै 2022 रोजी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पसमांदा मुस्लिमांसाठी स्नेह यात्रेची घोषणा केली होती. पसमांदा मुस्लिमांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांना भाजपशी जोडण्यासाठी पुढाकार घेणे हा या यात्रेचा उद्देश होता.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.