Home मराठी बातम्या राजकारण संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स, वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स, वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स, वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी भोपाळला भेट देत आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी 3:15 वाजता, पंतप्रधान भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान राणी कमलापती रेल्वे स्टेशन,भोपाळ येथून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023

लष्करी अधिकाऱ्यांची ‘रेडी, रिझर्जंट, रिलेव्हंट’ अर्थात सुसज्ज, बलाढ्य आणि समर्पक या संकल्पनेवर आधारीत तीन दिवसांची परिषद भोपाळ येथे 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान आयोजित केली आहे. या परिषदेत सशस्त्र दलांमधील संयुक्तता आणि अभिनिवेश यासह राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या दिशेने सशस्त्र दलांची तयारी आणि संरक्षण परिसंस्थेतील प्रगतीचाही आढावाही यादरम्यान घेतला जाईल.

या परिषदेत तिन्ही सैन्य दलातील कमांडर आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कारवाई करणाऱ्या सैनिक, खलाशी आणि हवाई दलांतील जवान यांच्या सोबत सर्वसमावेशक आणि अनौपचारिक संवाद देखील आयोजित केला जाईल.

वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेसने देशातील प्रवासी प्रवासाचा अनुभव पुनश्च परिभाषित केला आहे. राणी कमलापती रेल्वे स्थानक, भोपाळ आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकादरम्यान सुरू होणारी नवीन रेल्वेगाडी ही देशातील अकरावी वंदे भारत रेल्वेगाडी आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे स्वरुप संपूर्ण स्वदेशी, अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असे डिझाइन केले आहे. हे रेल्वे प्रवाशांना जलद, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देईल, पर्यटनाला चालना देईल आणि या प्रदेशातील आर्थिक विकासाला गतीमान करेल.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.