Home मराठी बातम्या राजकारण त्रिपुरा : विधानसभेत पॉर्न पाहिल्याचा आरोप

त्रिपुरा : विधानसभेत पॉर्न पाहिल्याचा आरोप

त्रिपुरा : विधानसभेत पॉर्न पाहिल्याचा आरोप

आगरतला, 30 मार्चा (हिं.स.) : त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात बसून सत्ताधारी आमदार मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. कथित अश्लिल व्हिडीओ पाहणारे आमदार जादब लाल नाथ बागबासा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत असून सत्ताधारी भाजपचे सदस्य आहेत. दरम्यान हा व्हिडीको कुणी बनवला आणि व्हायरल केला याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

काही वर्षांपूर्वीपर्यंत त्रिपुरा हे राज्य डाव्या पक्षांचा बालेकिल्ला मानला जात असे. अनेक वर्षे तिथे डाव्यांची सत्ता होती. त्यानंतर 2018 साली भाजपची सत्ता आली होती. मात्र, डाव्यांचा गड असलेला बागबासा हा मतदारसंघ भाजपला तेव्हा जिंकता आला नव्हता. परंतु, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जादब लाल नाथ यांनी ही कामगिरी फत्ते केली. यंदाच्या निवडणुकीत जादब लाल नाथ यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बिजीता नाथ यांचा विजयरथ रोखला. त्यांनी बिजीता नाथ यांचा 1400 मतांनी पराभव केला. तृणमूल काँग्रेसचे बिमल नाथ तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते, तर टिपरा मोथाच्या कल्पना सिन्हा चौथ्या स्थानावर राहिल्या. या विजयामुळं पक्षात त्यांचे वजन कमालीचे वाढले होते. मात्र, आजच्या घटनेमुळे त्यांच्यासह भाजपचीही कोंडी झाली आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.