Home मराठी बातम्या राजकारण गोवा : जी-20 परिषदेसाठी तयारी जोमात

गोवा : जी-20 परिषदेसाठी तयारी जोमात

गोवा : जी-20 परिषदेसाठी तयारी जोमात

पणजी, 27 मार्च (हिं.स.) : गोव्यात होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. पणजी शहरातील सरकारी, तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या इमारती, दुकानांच्या दर्शनी बाजूच्या भिंती व परिसराची रंगरंगोटी सुरू आहे. त्याशिवाय कंदब बसस्थानकासमोरील जागेत वाहतूक बेट तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

गोवा येथे जी-20 शिखर परिषदेच्या 8 बैठका होणार आहेत. त्यातील पहिली 17 ते 19 एप्रिल अशी 3 दिवसांची बैठक ‘ताज’ आणि ‘ग्रँड हयात’ या दोन ठिकाणी होणार आहे. त्यासाठी स्थानिक कदंबा बसस्थानकासमोर अटल सेतूच्या खालील बाजूस ध्वजाजवळ वाहतूक बेट तयार केले जात आहे. यासोबतच ‘जी-20’चा परिषदेमुळे अनेक ठिकाणच्या पदपथांचे भाग्य उजळले आहे. भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर रस्ता दुभाजकाची नव्याने उभारणी केली जात आहे. ज्या इमारतीसमोरील पदपथावरील पेव्हर्स खराब झाले आहेत, ते बदलण्याचे कामही वेगाने सुरू आहे. याशिवाय संध्याकाळी 18 जून मार्गावर हॉटमिक्सचा थर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. उत्तर त्याशिवाय लष्कराच्या इमारतीला रंगरंगोटी करण्याचेही काम सुरू आहे. मांडवी किनारी असणाऱ्या पदपथावर नव्याने इंटरलॉकिंग पेव्हर्स बसविण्याचे काम सुरू होते. पणजी जिमखान्यापासून कला अकादमीपर्यंतचा फुटपाथ खोदलेला आहे. त्याशिवाय या ठिकाणी उभारलेले आणि चालू नसलेले पथदीपही हटवून नव्या खांबांची तसेच पथदीपांची उभारणी करण्यात येत आहे. एकंदर संपूर्ण पणजी शहराला सुशोभित करण्याच्या कामाने वेग पकडला आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.