Home मराठी बातम्या राजकारण आदित्य ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, ४० आमदार

आदित्य ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, ४० आमदार

आदित्य ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, ४० आमदार

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या चाळीस आमदारांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मिळेल त्या व्यासपीठावर चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे वर खोके सरकार …50 खोके एकदम ओके …गद्दार अशा विविध बोचणाऱ्या शब्दांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना हैराण करून सोडले आहे.

राजकारणात एकतर्फी आरोप होत नाहीत त्यांना प्रत्यारोप होतात…. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून जोरदार प्रतिघातला केला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना सज्जड दमच दिला आहे त्यांनी शिवसेनेच्या, विशेष करून ठाकरे कुटुंबाच्या आतल्या गोष्टींचा पाढाच वाचला आहे….. पाहूया शितल मात्रे म्हणतायत!

जहरी टीका ही शिवसेनेची ओळख असलेली आज ठाकरे कुटुंबावरच उलटू लागली आहे. भविष्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यातील शिवसैनिकांचा वाद विकोपाला जातो की सामंजस्याने मिळतो हे येणारा काळच ठरवेल. आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.