Home मराठी बातम्या राजकारण मी आता फार लोणी लावायला तयार नाही”- नितीन गडकरी

मी आता फार लोणी लावायला तयार नाही”- नितीन गडकरी

मी आता फार लोणी लावायला तयार नाही"- नितीन गडकरी

नागपूर, 26 मार्च (हिं.स.) : विकासाच्या कामांना खीळ घालणाऱ्या प्रवृत्ती आणि अवास्तव दबावगट निर्माण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शाब्दीक चपराक लगावली आहे. तुम्हाला पटले तर मतदान करा किंवा करू नका परंतु, मी आता कुणाला फार लोणी लावू शकत नाही अशा शब्दात गडकरींनी ताशेरे ओढले आहेत.

पद्मविभूषण रघुनाथ माशेलकरांच्या हस्ते रविवारी गडकरींना मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. पिनाक दंदे, अनंत घारड आणि गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरात आयोजित या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, मी एकदा लोकांनाही सांगितले की पुष्कळ झाले आता, मी पण निवडून आलो. लोकांनो तुम्हाला पटले तर मत द्या नाहीतर नका देऊ. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही समाजकारणाला जास्त वेळ द्यायचा आहे असे गडकरींनी जाहीरपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आपलेही हित लोकांना कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्व समजत नाही अशी खंत गडकरींनी व्यक्त केली. मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या विषयांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वातावरण बदल हा विषय काही लोकांचा आहे असे त्यांनी सांगितले. वेस्ट लँडवर बांबू लागवड केली तर 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहु शकते. त्यातून पर्यावरण रक्षणासोबत रोजगार निर्मितीही होऊ शकते असे गडकरी यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.