Home मराठी बातम्या राजकारण नाराज नेत्यांचा पालिका निवडणुकीत भाजप त्यागाचा कर्नाटकी कित्ता ?

नाराज नेत्यांचा पालिका निवडणुकीत भाजप त्यागाचा कर्नाटकी कित्ता ?

नाराज नेत्यांचा पालिका निवडणुकीत भाजप त्यागाचा कर्नाटकी कित्ता ?

सोलापूर, 23 मे (हिं.स.) कर्नाटकात नुकत्याच झालेल्या‎ विधानसभा निवडणुकीत भाजपने‎ उमेदवारी नाकारलेले नाराज उमेदवार ‎ ‎काँग्रेस किंवा जनता दल (एस) मध्ये‎ गेले. यात अगदी माजी मुख्यमंत्री, ‎ उपमुख्यमंत्री आणि आमदारांचा‎ समावेश होता. गेल्या दहा वर्षांत कधी‎ नव्हे अशी नेत्यांची गळती दिसून‎ आली. तोच कित्ता भाजपमधील नाराज‎‎ नेते आगामी महापालिकेच्या‎ निवडणुकीत गिरवण्याची चिन्हे दिसत‎ आहेत.‎ झालेल्या कार्यक्रमात‎ माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी‎ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस‎ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या‎ उपस्थितीत भाजपचे माजी शहराध्यक्ष‎ प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये‎ प्रवेश केला.

भाजपमध्ये अपमान‎ केल्याचा आरोप करत त्यांनी स्थानिक‎ पक्ष नेतृत्वावर तोफ डागली. त्या‎ पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक‎ नेत्यांतील धुसफूस आता बाहेर पडत‎ आहे.‎ प्रा. निंबर्गी यांनी, ‘शहरात भाजपात‎ कोणाला मोठे होऊ दिले जात नाही.‎ मागील तीन वर्षांपासून भाजपात घुसमट‎ होत आहे’, असा आरोप केला. तर‎ भाजपमधील मालकशाहीमुळे इतर‎ नेत्यांचा निभाव लागत नसल्याचे माजी‎ नगरसेवक पाटील यांनी बोलून‎ दाखवले.‎ दुसरीकडे काँग्रेसने कर्नाटक‎ विधानसभा निवडणुकीत भाजपचा‎ धुव्वा उडवून दिला. त्यामुळे काँग्रेस ‎ ‎ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले ‎ ‎ आहे. त्यामुळे काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये‎ आहे. लोकसभा निवडणुकीसाठी‎ सोलापूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून‎ पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांना‎ उमेदवारी दिली जाणार असल्याचे‎ नक्की झाले आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.