Home मराठी बातम्या राजकारण मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक

मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक

मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक

ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे 60 सायकलप्रेमी नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. या सायकल रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवून सर्व सायकलप्रेमी यांच्यासह पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले, ६३ वर्षीय दुर्गा गोरे यांच्यासह आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक केले.

9 वर्षांच्या मुलीपासून 71 वर्षाच्या सायकल प्रेमी पर्यंत सर्वांनीच उपस्थित राहून सक्षम भारत, सुदृढ भारत या संकलपनेला अनुसरून फिट रहा, हिट रहाचा संदेश दिला. नऊवारी साडी, डोक्यावर फेटा घालून सर्व सायकल प्रेमी सहभागी झाले होते. यात विशेष करून खास मुंबईहून विश्व विक्रम विजेते सतीश जाधव, ठाणे ते घुमान सायकल वारी करणारे प्रा. नारायण बारसे, ७२ वर्षीय माजी पोलीस अधिकारी प्रवीणकुमार कुलथे, प्रा.सुनील भुसारा यांपासून सरकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते. आपल्या पाल्याचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांचे पालक उपस्थित होते. या रॅलीचे समन्वयक म्हणून संकेत सोमणे, धनश्री गवळी, दीपेश दळवी, विनोद फर्डे, पंकज कुंभार यांनी काम पाहिले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.