Home मराठी बातम्या राजकारण पारधी समाजाच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा देण्याची भाजपला घाई

पारधी समाजाच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा देण्याची भाजपला घाई

पारधी समाजाच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा देण्याची भाजपला घाई

सोलापूर 20 मे (हिं.स) महाराष्ट्र आदिवासी पारधी समाज संघटनेच्या सहकार्याने भाजपने नुकताच प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे आमदार, खासदार उपस्थित होते. पारधी समाजाच्या खांद्यावर राजकीय पक्षाचा झेंडा देण्याची घाई भाजपला झाली आहे.मात्र, मुळात स्वतः ला आदिवासी म्हणविणाऱ्या पारधी समाजावर हिंदुत्वाचा शिक्का मारून व्होट बॅंक ताब्यात ठेवण्याचा इरादा यामागे आहे. त्यापूर्वी त्यांना सर्व राजकीय पक्षांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने माणूस म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे.नऊ-दहा महिन्यापूर्वी गोष्ट. मोहोळचा सुशिक्षित युवक रेल्वेत फिरता विक्रेता म्हणून पुणे- सोलापूर रेल्वेगाडीत नेहमीप्रमाणे साहित्याची विक्री करत होता. याचवेळी या रेल्वेत चोरी झाली. अर्थात या चोरीसाठी या पारधी युवकाला पकडण्यात आले. चोरीची कबुली मिळविण्यासाठी झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.कुटुंबीयांना मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. सुमारे नऊ महिने हे पार्थिव पुणे येथील ससून रुग्णालयात होते. अखेर न्यायालयाने हस्तक्षेप करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांना भाग पाडले आणि नऊ महिन्यांनतर त्या युवकाला मुक्ती मिळाली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.