Home मराठी बातम्या राजकारण लिंग परिवर्तनासाठी १ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लढा कायम

लिंग परिवर्तनासाठी १ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लढा कायम

लिंग परिवर्तनासाठी १ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लढा कायम

Varsha Pawar, a female police officer with gender dysphoria, wants to transition to a man but is facing obstacles due to unclear government policies. After applying to the DG office and receiving no response, Varsha approached the High Court and was advised to seek help from the Chief Minister and Mat. Despite the difficulties of transitioning while in government service, Varsha has found support from others in the transgender community.

लिंग परिवर्तनासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लढा; शासन धोरणात बदल होणे गरजेचे ती ला तो व्हायचंय. पण लालफितीत हा लढा अडकला आहे. नांदेड च्या पोलिस विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी वर्षा पवार हिला लिंग परिवर्तन करायचं आहे. वर्षा यांना जेंडर डिस्पोरिया नावाचा आजार झालेला आहे. त्यांना पुरुष असल्याची भावना होत असल्याने त्या दोन वर्षांपासून लिंग परिवर्तनाची लढा सुरू आहे. पोलिस दलात 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि सध्या हदगाव तालुक्यातील मनाठा पोलिस ठाण्यात असलेल्या वर्षा पवार यांना चार वर्षापासून अचानक शरिरात बदल घडून येत असल्याने पुरुष असल्याचे भावना वाटत आहे. त्यामुळे वर्षा पवार यांनी कुटूंबाची सहमती घेऊन लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला.

वर्षा पवार यांनी जिल्हा नियोजन पोलिस अधिक्षक, डीजी ऑफिस मध्ये अर्ज केला तिथून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने वर्षा यांना देखील मुख्यमंत्री आणि मॅट कडे जाण्याचा सल्ला दिला आहे. वर्षा पवार यांना लिंग परिवर्तन करायचे आहे. मात्र, शासकीय सेवेत असलेल्या वर्षा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात शासनाचे धोरण स्पष्ट नसल्याने अडचणी येत आहेत. दरम्यान, वर्षा पवार यांना वर्ष भरा पुर्वी लिंग परिवर्तन करणाऱ्या डॉ. सान्वी जेठवानी यांनी साथ दिली आहे. यापुढे जेठवाणी यांनी वर्षा यांना पाठिंबा देत सहकार्य करणार असल्याचे सांगितले. समाजात वावरत असताना लिंग परिवर्तन करण्याचा प्रसंग हा वर्षा पवार यांच्यासाठी कठीण असला तरी आज समाजात आपल्या शारिरीक बदला बाबत समाजात न सांगता कुंठित बसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वर्षा पवार यांनी लिंग परिवर्तन करुन प्रवाहात राहण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.